🛑गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी लोरे नं २ येथे जात स्व.आबासाहेब यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-२८ :-* गगनबावडा तालुक्याचे माजी सभापती तथा लोरे नं 2 गावचे माजी सरपंच आबासाहेब रावराणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आलेले गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी लोरे नं 2 येथे जात स्व.आबासाहेब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी गोकुळचे संचालक बयाजीराव शेळके उपस्थित होते.
स्व. आबासाहेब आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे वडील पद्मश्री डी. वाय.पाटील यांचे अत्यंत घरोब्याचे संबंध होते. गगनबावडा पं. स.चे माजी सभापती असलेल्या स्व.आबासाहेब यांनी वैभववाडी स्वतंत्र तालुका निर्मितीत मोठे योगदान दिले होते.वैभववाडी तालुक्यासह गगनबावडा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. स्व. आबासाहेब यांच्या निधनानंतर सिंधुदुर्गात आलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आवर्जून लोरे येथील स्व.आबासाहेब रावराणे यांच्या घरी भेट दिली.स्व.आबासाहेब यांचे चिरंजीव मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजित रावराणे यांची भेट घेत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

