🛑 सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून दिला राष्ट्रवादीला धक्का..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-२८ :- येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम यांनी काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम यांनी आज मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडी धक्का बसला आहे विजय कदम यांचे स्वागत काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर, विजय प्रभू, शेखर जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

