महिलांच्या बचत गटांची कर्ज माफ करा व मायक्रोफायनान्सने दिलेल्या वित्तीय संस्थेकडून वसुलीचा तगादा न लावता घेतलेले कर्ज माफ करा..
▪️मनसे शिष्टमंडळाचे तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१५: महिलांच्या बचत गटांची कर्ज माफ करणे व मायक्रोफायनान्सने दिलेल्या वित्तीय संस्थेकडून वसुलीचा तगादा न लावण्याबाबत तसेच घेतलेले कर्ज माफ करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने तालुक्यातच्या वतीने निवेदन दिले.
मनसे शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा बचतगटांची महिलांची चळवळ १५ ते २० वर्षापूर्वी या जिल्ह्यात मोठ्या प्रमामात सुरु झाली. या चळवळीतुन अनेक महिलांनी आपले बचतगट निर्माण केले हे बचतगट निर्माण करण्यासाठी शासनाने वेगवेगळया प्रकारचे प्रोत्साहन देऊन महिलांचे बचतगट निर्माण करुन महिलांना संघटीत करुन त्या महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले गेले. त्यातुन अनेक बचतगटांनी शासनाच्या योजनेतुन वित्तीय संस्थेतुन कर्ज घेतले तर काही महिलांनी संस्थांनी मुद्रा व अन्य खाजगीवित्त संस्थेतुन व्यवसायाकरीता कर्ज घेतले आणि व्यवसाय सुरु केले. सुरु केलेली उत्पादने वेगवेगळया प्रदर्शनामध्ये व वेगवेगळया बाजारपेठांमध्ये आणि घरोघरी जावून विकुन स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न केला.
सदर महिलांनी कच्चामाल वेगवेगळ्या बाजारपेठेतुन तसेच कोकणातील स्थानिक शेतीतुन उत्पादन होणारे कच्चामालातुन वेगवेगळे उत्पादन तयार करुन वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये विकले जातो. त्यातुन अनेक महिलांनी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न केला आहे. या स्वावलंबातुन कार्यरत असताना सदर महिलांना मार्च २०२० महिन्यापासुन लॉकडाउनच्या काळात माल विक्री करता आला नाही. लॉकडाउनच्या काळात कच्चामाल आणता आला नाही व तयार माल विकता आला नाही. त्यामुळे सर्व महिला बचतगट व मायक्रोफायनान्स घेतलेल्या कर्जाची महिला आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. मायक्रोफायनान्स घेतलेल्या महिलांना खाजगी वित्तीय संस्थांकडुन वसुलीचा तगादा लावण्याचा व वसुली करण्याचा तगादा लावला जात आहे. ती वसुली थांबविण्याची तातडीचे आदेश व्हावेत व घेतलेले कर्ज माफ करुन नव्याने अल्प व्याजदराने कर्ज महिलांना देऊन त्यांना परत सक्षम उभी करण्याकरीता शासनाने मदत करावी अशी विनंती निवेदनद्वारे करण्यात आली.
यावेळी उपस्थित मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष ओंकार कुडतरकर, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, सचिव आकाश परब, देवेंद्र कदम आदी उपस्थित होते.
___________________________________________
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
___________________________________________
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

