संकेश्वर-बांदा हा नवा महामार्ग आंबोली-बावळाट मार्गे बांदा की, सावंतवाडी-इन्सुली-बांदा; जनता संभ्रमात
▪️महामार्ग सावंतवाडीतुन गेल्यास सावंतवाडी-माजगाव आणि इन्सुली-बांदा अशी भव्य बाजारपेठ सिंधुदुर्ग पाहु शकेल..
▪️हा नवा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहरासाठी शेवटची सुवर्णसंधी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.१५: केंद्र शासनाकडुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नामकरण झालेला संकेश्वर ते बांदा एन एच ५४८ हा नवा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, खरं तर हा नवा महामार्ग सावंतवाडी शहारातुन जाणे अपेक्षित आहे, परंतु अजूनही हा राष्ट्रीय महामार्ग आंबोली बावळाट मार्गे बांदा की, सावंतवाडी इन्सुली मार्गे बांदा होणार? यावरून सिंधुदुर्गात खासकरून सावंतवाडी तालुक्यातील जनता संभ्रमात आहे.

आतापर्यंत सावंतवाडी शहराने व्यापार व उद्योग वाढण्यासाठी अनेक स्वप्न बघितली परंतु अद्याप ती पुर्ण होऊ शकली नाहीत. याचे कारण म्हणजे शहरापासून आधीच खूप लांब अंतरावरून गेलेला कोकण रेल्वेमार्ग (रेल्वेस्टेशन) या नंतर सावंतवाडी तालुक्याबरोबरच शहराला एक स्वप्न दाखवण्यात आले ते रेल्वे टर्मिनसचे तेही अद्याप पुर्ण होऊ शकले नाही. हे सर्व घडुनही सगळ्यात मोठा फटका सावंतवाडी शहराला बसला. तो एन एच ६६ हा मुंबई-गोवा महामार्ग शहराबाहेरुन गेल्यामुळे हा रस्ता बाहेरून गेल्यामुळे शहरातील बाजारपेठेबरोबरच उद्योग, व्यापारात फरक जाणवु लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर हे महत्त्वाचे मानले जाते. काही काळ अगोदर गोवा राज्यात जाणारा प्रत्येक पर्यटक हा सावंतवाडी शहरातुनच प्रवास करत असे जुना राष्ट्रीय महामार्ग एन एच १७ हा सावंतवाडी, इन्सुली, बांदा मार्गे गोवा असा होता. त्यामुळे सावंतवाडी शहरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असायची परंतु आज परिस्थिती खूप वेगळी बघायला मिळते.

केंद्रशासनाने होऊ घातलेला एन एच ५४८ हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातुनच गेल्यास विकासाला चालना मिळणार आहे, सावंतवाडी आणि बांदा शहर याच्यातील अंतर हे १२ कि.मी. आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरापासून माजगाव आणि इन्सुली पासून बांदा अशी भव्य बाजारपेठ सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभु शकते, तस बघायला गेलं तर सावंतवाडी शहर हे जिल्ह्याची राजधानी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे या राजधानीचं महत्व टिकवणं हे गरजेचे ठरणार आहे, अन्यथा सावंतवाडी शहर भविष्यात लुप्त व्हायला वेळ लागणार नाही.

नवा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहरासाठी शेवटची सुवर्णसंधी आहे. आणि ही सुवर्णसंधी जर शहराच्या बाहेरून जात असेल तर त्यासाठी शहराने लढा द्यायला हवा आणि या संधीचं सोनं करून याचा लाभ घ्यायला हवा.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

