आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कै. सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांचा सहभाग

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. १४ संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कै. सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. या वर्षी देखील या सामाजिक उपक्रमांमध्ये कोविड काळात गरज भासणाऱ्या रक्तदान शिबिराचा उपक्रम संदेश पारकर मित्र मंडळाच्यावतीने घेण्यात आला. संदेश पारकर यांचे जवळचे मित्र कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ गेली काही वर्षे हे रक्तदान शिबिर घेण्यात येते. यावर्षी देखील या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ वाजल्यापासूनच हे शिबिर सुरू करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांकडून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जि. प. सदस्य संजय आंग्रे, स्वरूपा विखाळे, राजलक्षमी डीचवलकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, गितेश कडू, राजू राठोड, शेखर राणे, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, ऍड. हर्षद गावडे, विलास गुडेकर, संदेश पटेल, बाळा भिसे, नगरसेवक कन्हैया पारकर, भास्कर राणे, अवधुत मालणकर, रामदास वीखाळे, सचिन सावंत, नगरसेवक सुमेधा अंधारी, विकास कुडाळकर, मिलींद साटम, संतोष शिरसाट, अतुल बंगे, रुपेश जाधव, आदींनी या शिबिराला भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!