बांदा सीमा तपासणी नाका जमिन संपादन करताना ११९ शेतकऱ्यांची फसवणूक..
▪️शेतकरी न्यायासाठी लढा उभारणार; सीए साईप्रसाद कल्याणकर यांची माहिती
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.१३: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा सीमा तपासणी नाका जमिन संपादन करताना ११९ शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता न्यायासाठी लढा उभारणार आहे. आम्हाला १२५ कोटी रुपयांची जमिन संपादन आणि जमिनीत असणाऱ्या खनिजाची भरपाई मिळायला हवी होती, पण आमच्या हातावर ४ कोटी रुपये ठेवले आहेत, त्यामुळे आता योग्य न्यायालयात दाद मागणार आहे. अशी माहिती शेतकरी सीए साईप्रसाद कल्याणकर यांनी दिली आहे.
बांदा सीमा तपासणी नाक्यासाठी साईप्रसाद मंगेश कल्याणकर हे गेले काही दिवस वेगवेगळ्या पातळीवर विरोध करत आहेत.आता ते भूसंपादन प्रक्रिये विरोधात लढा देत आहेत.अंतिम अवॉर्ड करताना उपविभागीय अधिकारी महसूल तथा भूसंपादन अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांनी जमिनीत खनिज असल्याने १२५ कोटी रुपयांची नुकसान भरपाईच दिली नाही असे
उघड होत असल्याचे या लढ्याचे श्री साईप्रसाद कल्याणकर यांनी चर्चे दरम्यान सांगितले.
श्री. कल्याणकर सन २००८ साला पासून अर्पून हा लढा लढत आहेत.ते चार्टर्ड अकांऊटट असल्यामुळे त्यांना सखोल चौकशी करण्याची सवय आहे.त्यांनी माहितीच्या अधिकारात भूसंपादन प्रक्रियेचं कागद प्राप्त केलेत व त्यातून तर फारच मोठा भ्रष्टाचार उघड झाला असे त्यांनी स्पष्ट केले.त्यातून कोंकण आयुक्त यांनी प्रक्रियेतील अनेक दोष,त्रुटी,कायदा पालन न करणे,सुप्रीम कोर्टचे आदेश न पाळणे असे अनेक विषय बाहेर आले असे कल्याणकर म्हणाले.
यामध्ये २१५ कोटी किंमतीच्या लोह खनिजाची चोरी आरटीओ सिंधुदुर्ग यांना करण्यास मदत भूसंपादन अधिकारी यांनी करून आपल्या कर्तव्यात कसूर कल्याचे कल्याणकर यांनी उघड होत असल्याचे सांगितले.या जमिनीत लोह खनिजाचे मुबलक साठे आहेत तेव्हा ती जमीन बॉर्डर चेक पोस्ट साठी घेवू नये असे भूविज्ञान चे अधिकारी यांनी प्रथम अहवालात म्हटलेले आहे,नंतर प्रत्यक्ष जागेवर परत नागपूर खणीकर्म विभाग यांनी जागा पाहणी अहवाल प्रमाणे २०१० मध्येच ,या जमिनीत लोहखनिज ८४ हजार मेट्रिक टन असल्याचं रिपोर्ट दिला.त्याची रॉयल्टी आरटीओ कडून ५८ कोटी ८० हजार भरून घेतली.म्हणजे ही जमीन प्रमुख खनिज युक्तच होती हे सिद्ध होत आहे, असे श्री. कल्याणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यावर प्रारुंप निवड्यातील त्रुटी काढून कोंकण आयुक्त यांनी कोर्टाचे आदेशाचा अवमान करू नये अशी सुस्पष्ट सूचना देवून या जमिनीतील खनिजाचे मूल्य अवॉर्ड मध्ये जमिनीचा बाजारभाव मध्ये वाढवून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश केले होते.महसूल, विधी शाखेचे वरिष्ठ पातळी वरील आदेश व अहवाल घेण्याचे सुचविलेले होते.अस असता या खनिजाची काडीमात्र नुकसान भरपाई न करून देता फक्त रॉयल्टी घेवून १२५ कोटी किंमतीच्या खनिजाचे व जमिनीचे मालक आरटीओ यांना करण्यात आले,हे कल्याणकर यांनी उघड केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खनिजयुक्त जमिन शून्य किंमतीत आरटीओला मालकी करून देणे म्हणजे एक प्रकारे बहुमूल्य जमिनीची चोरीच आहे. या आरटीओ,प्रांत, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केली आणि आयुक्त यांनी ज्ञापनात सूचना व शेरे दिले असतानाही पुढे ऑडिट मध्ये एवढ्या वर्षात हा मुद्दा का तपासला नाही असा सवाल कल्याणकर यांनी केला आहे.
या प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांनी संगनमताने भूसंपादनाची चुकीची प्रकिया केली आहे त्यामुळे कलम १९३,१९९,२०१,२०४,२१७,२१८,२१९,४११,४१३,१२०अं आणि १२० ब प्रमाणे गुन्हे केले आहेत असे कल्याणकर यांनी बोलताना सांगितले. या प्रकरणात फसवणूक करत कोर्टाचे, आयुक्त यांचे आदेशाचा अवमान करून जमिनीची शून्य किंमतीत आरटीओ यांच्या घश्यात घातली असा लेखी तक्रार देऊन आरोप केला आहे व त्यासाठीचे तूर्तास निवेदन विभागीय आयुक्त निवडा शाखा कोंकण भवन न्यू मुंबई, गृहमंत्री महाराष्ट्र मुंबई, मुख्यमंत्री महाराष्ट्र मुंबई व इतर संबंधितांकडे सादर केले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_