महादेवाचे केरवडे सोसायटी समोरील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर दुसऱ्या दिवशी मागे..
▪️आ. वैभव नाईक, तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी ताक पिऊन सोडले उपोषण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴कुडाळ,दि.१३: तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थांनी शासनाची कर्जमाफी अद्याप न मिळाल्यामुळे गेले दोन दिवस महादेवाचे केरवडे सोसायटी समोरील कुटुंबासह आमरण उपोषण आज अखेर दुसऱ्या दिवशी मागे घेतले. आमदार वैभव नाईक, तहसीलदार अमोल पाठक यासह शिवसेना शिष्टमंडळाने दखल घेत उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा प्रश्न मार्गी लावला जाईल अशी ग्वाही दिल्यावर उपोषणकर्त्यांनी ताक पिऊन उपोषण सोडल्याचे जाहीर केले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थांनी शासनाची शेतकरी कर्जमाफी अद्याप न मिळाल्यामुळे दि. २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक, कुडाळ प्रांत अधिकारी, कुडाळ तहसीलदार, कुडाळ पोलीस निरीक्षक, चेअरमन श्री सहकारी महादेवाचे केरवडे ग्रामस्वराज्य सहकारी सोसायटी मर्यादित केरवडे यांना निवेदन देऊनही शासनाने दखल न घेतल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी वसंत दळवी, संभाजी निकम यांच्या सहित सुमारे ३० ग्रामस्थांनी महादेवाचे केरवडे सोसायटी समोर गेले दोन दिवस कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान आमदार वैभव नाईक, तहसीलदार अमोल पाठक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत येत्या सात दिवसात कर्जमाफीच्या प्रश्न मार्गी लावला जाईल अशी उपोषणकर्त्यांना ग्वाही दिली.
यावर उपोषणकर्त्यांनी येत्या सात दिवसाऐवजी येत्या महिन्याभरात आमच्या कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावा. अन्यथा आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानासमोर पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली जाईल, असा इशारा देऊन आमदार वैभव नाईक, तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते ताक पिऊन उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, तहसीलदार अमोल पाठक, यांच्यासह जि.प. सदस्य राजेश कविटकर, कुडाळ पं.स. सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, माजी उपसभापती श्रेया परब, पं.स.सदस्य मथुरा राऊळ, तालुकाप्रमुख राजन नाईक, घावनळे विधानसभा अध्यक्ष रामा धुरी, वाडोस माजी उपसरपंच कृष्णा धुरी आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_