नापणे गावासाठी कोविड 19 लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात यावा.
नापणे गावासाठी कोविड 19 लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात यावा. अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ अनिल पवार यांच्याकडे जनकल्याण बहुउददेशिय संस्थेच्या वतीने अध्यक्ष किशोर जैतापकर ,जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांनी निवेदनाद्वारे मकेली. पुढील आठवड्या कॅम्प आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.
नापणे गावातील लोकांना कोविड 19 लसीकरणासाठी उंबर्डे, वैभववाडी आशा अन्य ठिकाणी जावे लागत आहे.जाण्यासाठी लोकांना एस.टी.बस सुरू नसलयाने रिक्षा किंवा अन्य खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे लोकांना दान दुप्पट भाडे द्यावे लागत आहे .तसेच खाजगी वाहनाने जाऊन ही लस मिळेल याची खाात्री नाही. अनेक लोकांना दोन किंवा अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत.यामुळेच लोकांना आर्थिक भुर्दंड बसत असुन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नापणे गावातील लोकांसाठी गौरसोय दुर करण्यासाठी कोविड 19 लसीकरण केंद्र (कॅम्प) आयोजित करावा अशी मागणी जनकल्याण बहुउददेशिय संस्थेचे अध्यक्ष किशोर जैतापकर ,जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांनी ग्रामीण रुग्णांलयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल पवार यांच्याकडे केली आहे.