आपत्कालीनकोकण

विजेचा धक्का लागून म्हैस जागीच झाली गतप्राण

वैभववाडी प्रतिनिधी
विजेचा धक्का लागून करुळ जामदारवाडी येथील शेतकरी यशवंत मोतीराम साखरकर यांच्या मालकीची म्हैस दगावली आहे. ही घटना एडगांव व करूळच्या सीमेनजीक घडली आहे. अंदाजे 60 हजार किमतीची म्हैस दगावल्याने साखरकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी साखरकर यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. म्हैशी पालन करुन ते कुटुंबाचा भार हाकत आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या म्हैशी चारण्यासाठी सोडल्या होत्या. करुळ – एडगांव गावाच्या सिमेनजीक वीज वाहीनी तुटून जमिनीवर पडली होती. साखरकर यांच्या एका म्हैशीला तारेचा जोरदार शाँक लागला. यात ती जागीच गतप्राण झाली आहे. या घटनेत साखरकर यांच्यावर संकट कोसळले आहे. घटनास्थळी वीज वितरण अधिकारी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!