अखिल शिक्षक संघाच्या मदतीने सावंतवाडीतील पूरग्रस्त भारावले
*अखिल शिक्षक संघाच्या मदतीने सावंतवाडीतील पूरग्रस्त भारावले*
*सावंतवाडी तालुक्यातील 131 पूरग्रस्त कुटुंबांना धान्यादी माल व कपड्यांचे वाटप*
*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडीचा स्तुत्य उपक्रम*
सावंतवाडी:
गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य अतिवृष्टीमुळे व तेरेखोल नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठावरील प्रभावीत झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील 12 गावे प्रभावीत झालेली होती. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणा-या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडीच्या शिक्षकांनी या गावांतील जवळपास 131 पूरग्रस्त कुटुंबांना जवळपास दीड लाख रू.च्या धान्यादी माल व कपड्यांचा पुरवठा करून मदतीचा हात दिल्यामुळे पूरग्रस्त बांधव भारावले.
गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीकाठावरील 12 गावांतील अनेक कुटुंबाना पुराचा प्रचंड आर्थिक फटका बसला होता. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्याचे, कपड्यालत्त्याचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची घरे पडली, शेती तसेच घरातील साहित्यही वाहून गेले. जणू काही त्यांच्यावर दुखःचे आभाळच कोसळले. या दुखःतून त्यांना सावरावे, त्यांना मदत करावी या उद्देशाने संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस श्री.म.ल देसाई यांनी
‘एक हात मदतीचा, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा’ या उपक्रमाखाली पूरग्रस्तांना मदतीसाठी सावंतवाडी तालुक्यातील संघटनेच्या सदस्यांना आवाहन करताच संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. व पाहता पाहता चार दिवसांत जवळपास दीड लाख रूपयांची धान्यादी माल व कपड्यांच्या रूपात भरभक्कम मदत जमा झाली.
संघटनेच्या सदस्या श्रीम.लीना राऊत यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून जवळपास 10 ते 12 हजार रुपयांचे नविन कपड्यांच्या रूपात मदत जमा केली. तसेच संघटनेच्या हितचिंतक श्रीम.आशालता वेंगुर्लेकर यांनी 5000/-र.ची मदत जमा केली.
या जमा झालेल्या मदतीमधून प्रत्येक कुटुंबासाठी तांदुळ,डाळ, कडधान्ये, तेल,साखर, चहापाडर, मसाला, आटा इ. असे आठवडाभर पुरेल असे साहित्याचे कीट बनवले. सदरचे कीट व कपडे सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे, कलंबिस्त, सांगेली,माडखोल, सरमळे, ओटवणे, विलवडे, इन्सुली, बांदा, शेर्ले आदी गावातील 131 कुटुंबाना संबंधितांच्या गावोगावी, वाडीवस्तीवर जाऊन वाटप करण्यात आले. या प्रसंगी विलवडे सरपंच दळवी,माडखोल सरपंच शिरसाट,माजी उपसभापती कृष्णा सावंत,विनायक दळवी,बबन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या मदतीने पूरग्रस्त बांधव भारावले. संघटनेच्या मदतीसाठी त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. तसेच संघटनेच्या वतीने जीवनावश्यक व गरजेचे साहित्य पुरविल्याबद्दल पूरग्रस्त बांधवांनी संघटनेचे आभार व्यक्त केले.
“विद्यार्थी विकासासाठी नेहमी तत्पर असणा-या व नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणा-या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी च्या वतीने 2019 च्या महापुराच्या वेळी सुद्धा पूरग्रस्तांना जवळपास अडीच लाख रूपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत केलेली होती. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान शिबिरे, नेत्रतपासणी शिबिर, चष्मेवाटप शिबीर, मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप,महिला सक्षमिकरण असे सामाजिक उपक्रम संघटना नेहमी आयोजित करत असते. येत्या महिन्याभरात संघटनेच्या वतीने सुसज्ज रुग्णवाहिका लोकसेवेत दाखल होणार आहे. समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी , सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नेहमीच अग्रेसर राहिला आहे”, असे प्रतिपादन संघटनेचे संयुक्त चिटणीस श्री.म.ल देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.
पूरग्रस्तांना मदती साहित्याचे वाटप करताना संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस श्री.म.ल देसाई, तालुकाध्यक्ष संजय शेडगे, सचिव अमोल पाटील, बाबाजी झेंडे, सुभाष सावंत, गुरू राऊळ, नेहा सावंत, सुभाष सावंत, महेश पालव, प्रमोद पावसकर,संदीप, गवस,गुंडू सावंत, वंदना सावंत,रूपेश परब,तेजस्विता वेंगुर्लेकर, दीपक राऊळ, नरेंद्र सावंत, रवींद्र गोसावी, नितीन सावंत, दत्तू सावंत, मनोहर गवस, सरोज नाईक,अजित हिरेमठ,गणेश आत्राम, बाबणी ठाकूर,अर्चना देसाई, मालू लांबर,विजय खरात,हरिभाऊ घोगरे,प्रतिभा घोडगे,शितल गवस आदी पदाधिकारी व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.