शिवसेना जिल्हा परिषद सदस्य यांचे कालचे आंदोलन म्हणजे निव्वळ पोरखेळ
प्रतिनिधी सुनील आचरेकर
सिंधुदुर्गनगरी
केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हि राज्यात आदर्श आणि लोकाभिमुख कारभार करणारी जिल्हा परिषद आहे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत या कार्यक्षम आहेत म्हणून पक्ष नेतृत्वाने त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाची संधी दिली आणि सावंत यांनी सुध्दा पदाला न्याय देत लोकाभिमुख कारभार केला आहे त्यांच्या कामामुळे शिवसेना आणि पालकमंत्री हे बिथरले आहेत त्यामुळेच शिवसेना जिल्हा परिषद सदस्य यांचे कालचे आंदोलन म्हणजे निव्वळ पोरखेळ होता अशी टीका बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण आणि समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली आहे जिल्हा परिषदेचा कारभार ॲटीचेंबर मधून चालतो अशी टिका शिवसेना जिल्हा परिषद सदस्य यांनी केली होती त्याला चव्हाण आणि जाधव यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले सिंधुदुर्ग जिल्ह्या परिषदेने आतापर्यंत आदर्श असेच काम केले आहे त्यामुळे अनेक पुरस्कार जिल्हा परिषदला मिळाले आहेत ते केवळ जनहिताची विकास कामे केली त्यामुळेच जिल्हा परिषदेचा विकास निधी हा जिल्हा परिषद मतदारसंघात द्यायचा असतो जिल्हा परिषद सदस्य यांना द्यायला तो काय आमदार किंवा खासदार निधी या प्रमाणे नाही जिल्हा परिषदेचा कारभार हा पदाधिकारी सक्षमपणे चालवित आहे हे काम करत असताना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष यांचे मार्गदर्शन घेतले तर त्यात वावगे काय ते आम्ही या पुढे ही घेत राहु काही वेळा सभागृहात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते हेसुद्धा विरोधी सदस्य असुनही चर्चा रुपी मार्गदर्शन करतात ते सकारात्मक असेल तर त्याचा विचार होतो जिल्हा परिषदेचा कारभार ॲटीचेंबर कि जिल्हा परिषदेच्या सभागृहात विषय ठेवून चालतो हे यांना कळत नाही म्हणजे शिवसेना सदस्य हे वैचारिक दिवाळखोरीत गेल्याचे दिसून येते त्यांच आंदोलन आणि टिका म्हणजे नाचता येईना अंगन वाकडे असेच झाले जिल्हा परिषद माजी अध्यक्ष असतील त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन याचा उपयोग आम्ही करून घेनारच त्यात आम्हाला कमीपणा नाही यामुळे सेनेच्या सदस्याच्या पोटात दुखत असेल आणि त्यांना ॲटीचेंबरचा न बरा होणारा रोग झाला असेल त्यावर उपाय नाही यातुन योग्य संदेश सेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी घ्यावा सभागृहात शिवसेना सदस्य मंत्री महोदयांचे अभिनंदन ठराव घेण्या पलिकडे चर्चा करत नाही सेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास कामे आपल्या मतदारसंघात करण्यास कमी पडले आहेत तुमच्या वर विरोधी सदस्य म्हणून जिल्हा परिषद अन्याय करत आहे तर राज्य सरकार कडून निधी आणुन दाखवण्याची धमक नाही आपल्या अपयशाचे खापर जिल्हा परिषद वर फोडायचे बंद करा शिवसेना जिल्हा परिषदवर सत्ता मिळवण्यासाठी उतावळी झाली आहे त्यामुळे अशी बालीश आणि पोरखेळ आंदोलन करीत आहे सत्तेच त्यानच स्वप्न स्वप्नच राहणार आहे पून्हा राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता राहणारच आमच्या जिल्हा नियोजन समिती सदस्यावर निधी वाटपात पालकमंत्री यांनी अनेक वेळा दुजाभाव केला आहे समान निधी वितरण केले नाही हा आमच्या जिल्हा नियोजन समिती सदस्यावर अन्याय आहे याचा जाब आमचे सदस्य सभागृहात विचारतील या पुढे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आंदोलन करणार असा इशारा चव्हाण व जाधव यांनी दिला