रत्नागिरीराजकीयशासकीय

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रत्येक वार्डात बैठका घेऊन उमेदवारांची चाचपणी करावी..

▪️वरिष्ठांच्या सूचना; काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष लियाकत शाह यांची माहिती

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२८: आगामी चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने वरिष्ठांनी प्रत्येक प्रत्येक वार्डात बैठका घेण्याबरोबरच उमेदवारांची चाचपणी करावी,  अशा सूचना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व जिल्हा प्रभारी मनोज शिंदे, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, माजी खासदार हुसेन दलवाई, हुस्नबानू खलीपे यांनी दिल्या असल्याची माहिती शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी दिली. तर चिपळूण नगरपरिषदेत काँग्रेस मोठा भाऊ असल्याने आमच्या मनाप्रमाणे जागा वाटप व्हायला पाहीजे, असेदेखील स्पष्ट केले आहे. एकंदरीत यावरून चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर  लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चिपळूण नगरपरिषदेची निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असल्याने स्थानिक पातळीवर देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, चिपळूण काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी यांनी काँग्रेसच्या वतीने  भूमिका स्पष्ट केली आहे. ते यावेळी म्हणाले की काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे जिल्हाध्यक्ष विजय भोसले माजी खासदार हुसेन दलवाई हुस्नबानू खलिफे, निरीक्षक अशोक जाधव यांनी केलेल्या सूचनेनुसार चिपळूण  शहरामध्ये प्रत्येक वॉर्डात जाऊन कांग्रेसच्या उमेदवारांची तयारी सुरू करावी. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जाणार याबाबत उलटसुलट बातम्या येत आहेत. मात्र, प्रत्येक वॉर्डात जानेवारीपासून बैठका सुरू कराव्यात. इच्छुक उमेदवारांची चाचपणी करावी. काँग्रेस कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी कशी मिळेल ? याकडे पहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार शहरात प्रत्येक वॉर्डात संपर्क सुरू केलेला आहे. जानेवारी महिन्यापासून बैठकांवर भर दिला जाणार असून आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी केली जाणार आहे वरिष्ठांच्या निर्देशानुसार स्थानिक पातळीवरील निवडणुकांसंदर्भातील निर्णय वरिष्ठांना सांगायच आहे एकंदरीत आम्हाला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आल्याचे यावेळी लियाकत शाह यांनी सांगितले. चिपळूण नगर परिषदे निवडणुकीच्या दृष्टीने जानेवारी महिन्यात पार्लमेंटरी बोर्ड गठन होणार आहे.  या बोर्डाच्या माध्यमातून उमेदवार निश्चित केले जातील असे देखील यावेळी सांगितले. चिपळूण नगर परिषदेत काँग्रेस मोठा भाऊ असल्याने आमच्या मनाप्रमाणे जागावाटप झाले पाहिजे, असे देखील यावेळी लियाकत शाह यांनी स्पष्ट केले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!