शेर्ला डिवाइन मर्सी परिसरात कचऱ्याचा प्रसार…
शेर्ला डिवाइन मर्सी परिसरात कचऱ्याचा प्रसार…
धक्कादायक प्रकार ; संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष…
*बांदा* शेर्ला ते कास येथील सीमा लगत असलेल्या डिवायन मर्सी या ठिकाणीं कोविड 19 या आजाराचे पेस्शन्ट ठेवण्यात आले असुन त्यांच्या न्याहरीचे प्लास्टिकचे कागद, पिशवी, पत्रावळ, हे तेथील असलेल्या खड्यात न टाकता तो कचरा बाहेर टाकल्याने त्याचा पसार हा झपाट्याने होत आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांना याचा त्रास होत आहे. रुग्णांच्या वागणुकीमुळे त्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे मात्र अधिकारी वर्ग या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सावंतवाडी तहसीलदार राजाराम मात्रे यांच्या कानी ही बाब घालण्यात आली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी लक्ष घालून संबंधित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. संबंधीत अधिकारी या डिवायान मर्सी या ठिकाणीं भेट देत असतात परंतु याकडे दुर्लक्ष्य करत असल्याचे दिसुन येत आहे.