कोकणक्राइम

साटेली – भेडशी नळयोजनेचे पाणी सोडण्याचे दोन गेट वॉलांची अज्ञात व्यक्तिने केली मोडतोड..

_*🛑 साटेली – भेडशी नळयोजनेचे पाणी सोडण्याचे दोन गेट वॉलांची अज्ञात व्यक्तिने केली मोडतोड..*_

_*🛑 अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल..*_

_*🛑 अशी कृत्य करणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करावी ; ग्रामस्थांची मागणी..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२६ :-* साटेली – भेडशी नळयोजनेचे पाणी सोडण्याचे दोन गेट वॉल काल रात्री अज्ञात व्यक्तिंनी चालू करून पाण्याच्या टाकितील पाणी खाली केले व त्या गेट वॉल ची मोडतोड केली. ते गेट वॉल कुचकामी केले आहेत. त्यामुळे साटेली – भेडशी तिल काही भाग आज नळयोजनेच्या पाण्याविना वंचीत राहीला .
याबाबत नळकामगार यांनी आज सरपंच लखू खरवत यांना माहिती देताच सरपंच लखू खरवत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत सोमवारी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्रीच्या वेळी अशी कृत्य करणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थां मधुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!