वैभववाडी-फोंडाघाट वाहतूक ठप्प
वैभववाडी प्रतिनिधी
बुधवारी रात्रभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन अनेक कॉजवे पाण्याखाली गेल्याने गावागावातील संपर्क तुटला आहे. लोरे येथील शिवगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वैभववाडी – फोंडाघाट वाहतूक बंद झाली आहे.
वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव व कॉन्स्टेबल जामसंडेकर व इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय रस्त्यावर चिरे लावून पोलिस प्रशासनाने तात्पुरता रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.