परुळे हायस्कूल चा निकाल १०० टक्के..
_*🛑 परुळे हायस्कूल चा निकाल १०० टक्के..*_
_*🛑 कुमारी रूणाली शरद माडये वेंगुर्ले तालुक्यात प्रथम..*_
_*🛑 शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन..*_
_*🛑 सलग तीन वर्षे वेंगुर्ला तालुक्यात परुळे हायस्कूल अव्वल..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ले, दि-२१ :-* वेंगुर्ला तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यालय परुळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी रुणाली शरद माडये हिने घवघवीत यश प्राप्त करून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक कुमारी लीनता मुंडये व तृतीय क्रमांक कुमार जयेश घारे त्यांने प्राप्त केला आहे. तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावण्याची परुळे हायस्कूलने हॅट्रिक साधली आहे. सलग तीन वर्षे परुळे हायस्कूल वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत आहे.
परूळे हायस्कूलच्या या गुणवान विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री सचिन देसाई व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन केला.
यावेळी विभागप्रमुख योगेश तेली, महेश सामंत, युवासेना विभाग प्रमुख विजय घोलेकर, युवानेते रोहित म्हापणकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश परुळेकर उपस्थित होते.

