डॉ. ओंकार वेदक माणुसकी जपणारा डॉक्टर, देवमाणूस..

डॉ. ओंकार वेदक माणुसकी जपणारा डॉक्टर, देवमाणूस..

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कान, नाक, घसा विषेतज्ञ म्हणून बजावत आहेत आपले कर्तव्य..

कान, नाक, घसाचे दुर्बिणद्वारे तपासणी करून रुग्णांना देतात योग्य उपचार..

समीर चव्हाण

आज काल डॉक्टरी पेशा हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे. आपल्या डॉक्टरी पेशाचा वापर करून वारेमाप फी आकारून बक्कळ पैसा कमविणाऱ्या डॉक्टरांची आपल्याकडे काही कमी नाही. पण आजच्या या व्यावसायिक जगात सुध्दा प्रामाणिकपणे पैशाचा मोह न बाळगता रुग्णसेवा करणारे, रुग्णसेवेचा आपला घेतलेला वसा जपणारे डॉक्टर सुध्दा आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे लाईड टाईम हॉस्पिटल पडवे येथे कार्यरत असलेले “डॉक्टर ओंकार वेदक”.
डॉ ओंकार वेदक हे पडवे हॉस्पिटल येथे कान, नाक, घसा विषेतज्ञ म्हणून आपले कर्तव्य अतिशय चोख पद्धतीने बजावत आहेत. अतिशय शांतपणे आपुलकीने रुग्णांशी संवाद साधून डॉक्टर त्यांची समस्या समजून घेतात व नंतर मुद्देसुद त्या समस्येवर उपाय व औषधोपचार रूग्णांना समजावून सांगतात. डॉक्टरांची बोलण्या वागण्याची पद्धत एवढी गोड आहे की रूग्ण त्यांच्या मधाळ वाणीनेच अर्धे बरे होतात. त्यांची अजून एक खासियत म्हणजे ते उगाच अधिकची औषधे, टेस्ट करायला लावून रुग्णांच्या खिशाला अधिकचा भुर्दंड देत नाहीत. त्याची तपासणी फि सुद्धा अतिशय माफक सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशीच आहे. एखादा अत्यंत गरीब रूग्ण आला तर ते आपली फी सुध्दा सांगत नाहीत. असा मोठ्या मनाचा डॉक्टर आजच्या काळात भेटण म्हणजे कठीण. मूळात आपल्याकडे आलेला रुग्ण कमीत कमी खर्चात कसा बरा होईल हाच त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. अशाप्रकारे निःस्वार्थ हेतूने रुग्णसेवा करणारे डॉक्टर आता दुर्मिळच.
डॉक्टर ओंकार वेदक यांनी भारतातील नामवंत मेडिकल संस्था के. जी. एम. सी. लखनऊ मधून कान, नाक, घसा विषेतज्ञ ही पदवी प्राप्त केली आहे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक कीचकट ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले आहेत. काही वर्षांपूर्वी लखनऊच्या एका हॉस्पिटल मधे एका रुग्णाच्या घस्या जवळील दोन किलोचा कॅन्सर ट्युमर ऑपरेशन करून यशस्वीपणे काढण्यात आला. या यशस्वी ऑपरेशनमधे डॉक्टर ओंकार वेदक यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
लाइफ टाइम हॉस्पिटल पडवे येथे कान नाक घसा रूग्ण तपासणी व उपचारांसाठी अतिशय अध्यायावत यंत्रसामग्री उपलब्ध आहे. दुर्बिणीच्याद्वारे रुग्णांची तपासणी केली जाते रुग्णाला काय त्रास आहे तो कशामुळे होतोय आणि काय उपचार केल्यावर तो बरा होईल हे स्क्रीनवर दाखवून रुग्णाला समजावल जात. या अध्यायावत यंत्रसामग्रीला डॉ. ओंकार वेदक यांची जोड म्हणजे दुग्धशर्करा योग.
आपल्याला कान, नाक, घसा या पैकी कोणत्याही अवयवाचा आजार असेल तर वेळ न दवडता लवकर डॉ. ओंकार वेदक यांना भेटा व योग्य उपचार घेवून आपल्याला होत असलेल्या त्रासातून मुक्ती मिळवा डॉ. ओंकार वेदक यांचा संपर्क क्रमांक पुढीप्रमाणे ९३०९८८६०५६
डॉ. ओंकार वेदक यांच्यासारखे अत्यंत हुशार, रुग्णांशी नम्रपणे वागणारे व माणुसकी जपत रुग्णसेवा करणारे डॉक्टर सिंधुदुर्गात आपले कर्तव्य बजावत आहेत हे आपले भाग्यच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!