▪️सावंतवाडी येथे “ताण तणाव” – “कारणे व उपाय” या कार्यशाळेचे आयोजन
▪️सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांचा स्तुत्य उपक्रम
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी :* सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान व उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने ” ताण तणाव – कारणे व उपाय” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या समुपदेशक सौ अदिती कशेळीकर यांनी मार्गदर्शन केले. निवडक निमंत्रितांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली. यात प्रामुख्याने डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक हे सहभागी झाले होते. यावेळी….
बदलती जीवनशैली, वातावरण, स्पर्धात्मक कार्यपद्धती तसेच सध्याचा कोरोना महामारीचा कालावधी ई मुळे समाजात ताणतणाव, नैराश्य, भीती, असुरक्षितता अशा समस्यांनी समाज मन ग्रस्त होतांना दिसतं.
याचा कुठेतरी मानसिकतेवर परिणाम होत असतो. शारीरिक समस्येसारखीच ही मानसिक समस्या आहे, तेवढीच महत्वाची आहे, त्यामुळे दूर्लक्षून चालणार नाही. स्वास्थ्य जीवन जगण्यासाठी, स्वस्थ समाज निर्मितीसाठी जसे शारीरिक आरोग्य महत्वाचे आहे, तसेच मानसिक आरोग्य देखील महत्वाचे आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या स्वस्थ व्यक्तीच्या व्याख्येत, शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्यालाही तेव्हढेच महत्त्व दिले गेले आहे, असे प्रतिपादन अदिती कशेळीकर यांनी केले.
लहानांपासून तो वृध्दापर्यंत सर्वच जण काहीनाकाही ताण सहन करीत असतात, तणावात असतात. त्याची कारणे व त्यावर सहज सोपे उपाय उदाहरणासाहित सौ अदिती कशेळीकर यांनी समजावून सांगितले. वैयक्तिक, कौटुंबिक, कार्यालयीन, सामाजिक स्थितीतून निर्माण होणारे किंवा आपणच निर्माण केलेले तणाव कसे निवळावे ? या मानसिकतेतुन निर्माण झालेल्या समस्येवर शांतपणे पण तणावरहित विजय कसा मिळवावा ? ध्यान, योग, सकारात्मक विचार यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग, या सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. कोरोना काळात आपले व विशेषत्वाने जे बाहेर पडत नाहीत अशी मुले, घरातील जेष्ठ यांची मानसिकता कशी उत्तमरीत्या सांभाळावी ? याविषयावर देखील चर्चा घेतली. या कार्यशाळेचा समारोप प्रश्नोत्तरांनी झाला. कार्यशाळेनंतर वैयक्तिक समस्येवर सुद्धा अनेकांना सौ कशेळीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी नागरिकांनी झालेल्या मार्गदर्शनाबाबत व आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ प्रेशा सापळे यांनी भूषविले. सूत्रसंचालन श्री अँड्र्यू फर्नांडिस यांनी केले व आभार भार्गवराम शिरोडकर यांनी मानले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

