आपत्कालीनआरोग्य

अत्यवस्थ महिलेसाठी पत्रकार निलेश मोरजकरांनी केले रक्तदान

वाडोस (ता. कुडाळ) येथील अत्यवस्थ रुग्ण सौ. गौरी बाबाजी झिमणे यांना आपत्कालीन परिस्थितीत बांदा येथील ‘सकाळ’चे पत्रकार तथा सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य निलेश मोरजकर यांनी तात्काळ रक्तदान करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आज त्यांनी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात येऊन रक्तदान केले. विशेष म्हणजे त्यांचे हे १४ वे रक्तदान आहे.
मोरजकर हे रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, गोवा येथील रक्तदान चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांना तात्काळ रक्तदत्तांच्या माध्यमातून रक्त उपलब्ध करून दिले आहे. आपला वाढदिवस ते दरवर्षी रक्तदान करून साजरा करतात. वाडोस येथील रुग्णाला तात्काळ रक्ताची आवश्यकता होती. मोरजकर यांना समजताच त्यांनी तात्काळ याठिकाणी येत रक्तदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!