कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशैक्षणिक

🛑 राजापूर येथील दहावी परीक्षा निकाल..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि-१७ :- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीचा निकाल पुढील प्रमाणे लागला आहे. राजापूर हायस्कूल मधून ईश्वरी विलास प्रभुदेसाई ९५.२०% गुण मिळवून प्रथम आली असून विजेता महेश कणेरे ९४.८०% गुण मिळवून दुसरा तर युवराज मधुकर कोळेकर ९३.८०% गुणांसह तिसरा आला आहे. राजापूर हायस्कूल चा निकाल १००% लागला आहे.

नवजीवन हायस्कूल राजापूरचा दहावीचा निकाल १००% लागला आहे. बुशरा मोहम्मद अली काझी ९२% गुण मिळवून प्रथम, मारूफा समीर मुल्ला ८७.४०% गुण मिळवून द्वितीय तर अदनान वाजहुल कमर खान ८५.६०% गुणांसह तृतीय आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर, उपाध्यक्ष निजाम काझी, सचिव मजीद पन्हाळेकर, प्राचार्य राजेंद्र कुमार व्हनमाने तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

नॅशनल इंग्लिश स्कूल रानतळे चा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला आहे.

फिझा सलीम पिरखान ९८% प्रथम, सिद्धी नरेंद्र मोहिते ९६.६०% द्वितीय तर महंमद ताझीम सलीम इसफ ९५.८०% गुण मिळवून तृतीय असे क्रमांक पटकावले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष असिफअली महामुद चौगुले, उपाध्यक्ष कमालुद्दीन मापारी, सचिव नूरुद्दीन काझी, सर्व पदाधिकारी, प्राचार्य इक्बाल कबिनाव व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!