🛑 अवैध धंद्यांचे सिंधुदुर्गशी नाते ; सांबर शिंगांसह १ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि-१७ :- सिंधुदुर्गातून विक्रीसाठी आणलेली सांबराची दोन शिंगे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करून राजापूर तालुक्यातील उन्हाळे गाडगीळवाडी येथे पकडली आहेत.
शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी पावणे दोन च्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अवैध विक्रीसाठी आणलेली दोन सांबर शिंगे आणि मुद्देमाल असा सुमारे १ लाख १९ हजार ५३० रुपयांचा ऐवज जप्त केला. अनंत त्रिंबक राणे व संभाजी अशोक पिंगुळकर दोघेही राहणार रेडी तालुका वेंगुर्ले जिल्हा सिंधुदुर्ग या संशयितांना अटक केली.
वेंगुर्ला येथून दोन इसम सांभर शेंगांची विक्री करण्यासाठी राजापूर येथे येत असल्याबाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, बाळू पालकर, पोलीस नाईक सासवे, सत्यजित दरेकर, शांताराम झोरे यांनी ही कारवाई केली. संशयित वाहन उन्हाळे गाडगीळवाडी नजीक आले असता पोलिसांनी त्या गाडीची कसून तपासणी केली. त्यात दोन सांबर शिंगे आढळून आली. या सांबरशिंगांची खातरजमा राजापूर वनपाल सदानंद घाटगे यांचेकडून करण्यात आली.
आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करीत आहेत.

