आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

🛑 विश्व हिंदू परिषद प्रखंड राजापूर व वारकरी समाज संप्रदाय राजापूर यांचे वतीने तहसिलदारांना निवेदन..

🛑वारी विरोध, वारकऱ्यांवर अत्याचार,भागवत धर्माच्या पताकांचा अवमान व जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेच्या निषेधार्थ निवेदन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि-१७ :- विश्व हिंदू परिषद प्रखंड राजापूर व वारकरी समाज संप्रदाय राजापूर यांचे वतीने आज शनिवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ठिक ११ वाजता तहसीलदार प्रतिभा वराळे, राजापूर यांना वारी विरोध, वारकऱ्यांवर अत्याचार,भागवत धर्माच्या पताकांचा अवमान व जेष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार ऑफिसला सुट्टी असून सुद्धा तहसीलदार प्रतिभा वराळे स्वतः तहसीलदार कचेरी राजापूर येथे उपस्थित राहिल्या. यावेळी निवेदन देताना वि.हिं.प. अध्यक्ष अशोक पाटणकर, प्रखंड मंत्री संदेश टिळेकर, बजरंग दल संयोजक अद्वैत अभ्यंकर, विश्व हिंदू परिषद राजापूर कार्यकारणी सदस्य विद्याधर करंबेळकर हे उपस्थित होते. यावेळी राजापूर तालुका वारकरी समाज संप्रदायाचे राजापूर तालुका अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!