शिवसेनेत संदेश पारकर यांना न्याय निश्चित मिळेल – पालकमंत्री उदय सामंत
🛑 माझा व आमदार वैभव नाईक यांचा संदेश जवळचा मित्र, त्यामुळे त्याला मोठे केलेच पाहिजे
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. १४ संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मी गेली अनेक वर्षे येत आहे, माझा व आ. वैभव नाईक यांचा जवळचा संदेश मित्र आहे. त्या मित्राला मोठं केलं पाहिजे. कारण समाजाबद्दल तळमळ त्यांच्या कर्तृत्वात आहे. कोरोना कालावधीत काम करणाऱ्या कोरोना योध्याचा सन्मान संदेश पारकर यांनी केला. माझा राजकीय उत्कर्ष संदेश पारकर यांच्यामुळेच झाला आहे. त्यांना मानाचे पद मिळाले पाहिजे, ही आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेत संदेश पारकर यांनी संयम ठेवावा, न्याय निश्चित मिळेल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कोरोना योध्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर आ. वैभव नाईक, बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला आघाडी अध्यक्षा नीलम पालव सावंत, राजू शेट्ये, बाळा भिसे, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जिल्हा परिषद सदस्या राजलक्ष्मी डिचोलकर,स्वरूपा विखाळे, संजय आंग्रे, विकास कुडाळकर,संतोष शिरसाठ,अनंत पिळणकर, नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर, विलास साळसकर, अवधूत मालणकर, अतुल बगे, राजू राठोड, प्रथमेश सावंत, हर्षद गावडे, रिमेश चव्हाण, निसार शेख, अनुप वारंग, विलास कोरगावकर, संतोष पुजारे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

