कणकवली शहरात होत आहे ट्राफिक जॅम, सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे त्रास…
🛑 टु व्हीलर, फोर व्हीलर रस्तात गाड्या उभ्या करून जात आहेत खरेदीला…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. १३ कणकवली शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची वर्दळ वाढली आहे, त्यामुळेच रस्त्यावर ट्राफिक होत आहे. याचाच परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. एस. एम हायस्कूल समोरील अंडरग्राऊंड पुलाच्या खाली, रस्त्यावर कोणीही कशाही पद्धतीने गाड्या लाऊन निघुन जात आहेत. एस. एम हायस्कूल समोरील फुटपातवर रिक्षा लावल्या जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि ट्राफिक होत. खरेदी करतेवेळी लोक आपल्या गाड्या कुठेही आणि कशाही पद्धतीने लाऊन, मनाला वाट्टेल तिथे फिरत आहेत.
ट्राफिक पोलिस अधिकारी या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडी मालकांना पहिले समजावून सांगत आहेत, परंतु कोणी त्यांचे ऐकत नसल्याचे प्रामुख्याने जाणवत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस अधिकारी त्या गाड्यांना दंड ठोठावत आहेत.
दंड ठोठावला की, लोक पोलिस अधिकाऱ्यांनाच उलट बोलुन शिव्या – गाळ करत आहेत. त्यांच्या अंगावर धाऊन जाणे, राजकारणी लोक किंवा मोठ्या अधिकाऱ्यांची धमकी देणे. हे सर्व प्रकार कणकवली शहरात दिवसेंदिवस वाढतच आहेत.
या सर्व गोष्टींवर कुठेतरी आळा बसला तरच लोक सुधारतील. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि होत असलेल्या समस्या दुर केल्या पाहिजेत.
टु व्हिलर आणि फोर व्हिलर यांचे प्रमाण जास्त आहे, ते वाहन चालवताना इकडे – तिकडे न पाहत सुसाट वेगाने जातात. त्यामुळे चालत जाणारी घाबरत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील पाणी लोकांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे त्या ओल्या अंगांणेच नागरिक बाझार खरेदी करुन, तसेच घरी निघुन जातात. अशातच त्यांना सर्दी, खोकला, ताप येतो आणि आजारी पडतात.
याकडे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष्य देणे गरजेचे बनले आहे. त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिल्यास, सर्वांनाच होणारा त्रास कमी होईल.

