राजापूर तालुक्यातील एकूण ३९ हजार ६४३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण.
_*🛑 राजापूर तालुक्यातील एकूण ३९ हजार ६४३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर*
*🎴राजापूर, दि-११ :-* तालुक्यात ज्याप्रमाणात लस उपलब्ध होत आहे त्या प्रमाणात नियोजन करून १० जुलै अखेर तालुक्यात एकूण ३९ हजार ६४३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी भविष्यात मात्र लसीकरण मोहीम वेगाने वाढविली जाणार असून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होताच गाव पातळीवरही लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. आजपर्यंत तालुक्यात कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २७ हजार ९९ इतकी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३ हजार ७७७ इतकी आहे. कोवीशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५ हजार ६४२ इतकी असून दुसरा डोस देणार्यांची संख्या ३ हजार १३२ इतकी आहे.
तालुक्यातील राजापूर व रायपाटण दोन ग्रामीण रुग्णालये, नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व उपकेंद्रा मधून ही लसीकरण मोहीम राबविली जात आहे. भविष्यात मात्र जास्त प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करणार असल्याचे डॉ. निखिल परांजपे यांनी सांगितले.