फादर स्टॅन स्वामी यांच्यावर लादलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे ; अनिल भोसले

_*🛑 फादर स्टॅन स्वामी यांच्यावर लादलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे ; अनिल भोसले*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-११ :-* फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू ही नैसर्गिक घटना नसून क्रूर हत्या आहे. ही घटना निंदनीय आणि निषेधार्ह अशी आहे. सद्य केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निष्पाप फादर स्टॅन स्वामींना आपला जीव गमवावा लागला असल्याची भावना महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केली.
. श्री . भोसले पुढे म्हणाले की, समाजासाठी निस्वार्थीपणे योगदान देणाऱ्यांसाठी नक्कीच हा विषय धोकादायक असून एकूण समाजासाठी फार गंभीर व चिंताजनक आहे. परंतु देशात घडणाऱ्या या प्रकारच्या अमानवीय घटनावर आपण व देशातील संविधान प्रेमी खासदार आणि इतर नेत्यांनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. या विषयाला घेऊन केंद्र सरकारकडे आमच्या सहीत काही सामाजिक संस्था एका आंदोलना द्वारे अशी मागणी करणार आहोत की, फादर स्टॅन स्वामी यांचेवर खोटे गुन्हे दाखल करून समाजसेवी वृत्तीवर जो अन्याय करण्यात आला. त्याचे समर्थन होणे शक्य नाही. म्हणूनच फादरांना त्यांच्यावर दाखल गुन्हे मरणोपरांत रद्द करून त्यांना निर्दोष घोषित करावे, तसेच फादर स्टॅन स्वामींच्या सोबत व त्या एकाच गुन्ह्यात अडकवलेल्या इतरांचीही निर्दोष सुटका करावी. तरी सर्व समविचारी देशाच्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, या आंदोलन वजा प्रचार मोहिमेत सहभागी होऊन फादर स्टॅन स्वामी व त्या सोबतच्या लोकांवर झालेल्या अन्याय विरोधात आवाज उठवावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. हीच फादर स्टॅन् स्वामी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. असे भोसले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!