मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर ट्रक उलटला मात्र….
मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड येथील एका अवघड वळणावर गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर उलटून अपघात झाला आहे.
राजापूर शहरानजीक असलेल्या कोंढेतड येथील एका अवघड वळणावर शनिवारी दुपारी दिडच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर अपघातग्रस्त झाला आहे. चालकाला उतारावरील या वळणाचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीमधून बाहेर उडी मारल्यामुळे तो बालंबाल बचावला आहे.मात्र कंटेनर चे.मोठे नुकसान झाले आहे.

