शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी वैभव मालंडकर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.११: शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेना संलग्न भारतीय कामगार सेना महासंघाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी वैभव मालंडकर यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेना (संलग्न भारतीय कामगार सेना महासंघाचे) अध्यक्ष निलेश उर्फ आप्पा पराडकर यांनी निवडीचे नियुक्तीपत्र दिले. तसेच निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
कलमठ येथील कार्यालयात झालेल्या या निवडीवेळी हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे सिंधूदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, सरचिटणीस रिमेश चव्हाण, राजू राठोड, बबन शिंदे, नयन यादव, नयन सुतार, सूरज सुतार, आतिष कांदळकर, प्रथमेश परब, सूरज घाग आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वांचे प्रेरणास्थान हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारातून तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेवरून ही निवड करण्यात आली आहे.
लोकाभिमुख सामाजिक कार्याची सर्व समावेशक विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहचवून पदश्रेष्टींनी आपल्याकडे सोपवलेली जबाबदारी अनुसरून सुयोग्य पद्धतीने सांभाळाल तसेच महाराष्ट्रातील तमाम संघटित व असंघटित कामगार बंधू-भगिंनीना एकत्र करून त्याच्या अढी-अडचणी अभ्यासक पूर्वक पद्धतींने सोडवून त्याना योग्य न्याय देत रहावेत. हिंद भारतीय जनरल कामगार सेना मजबूत कराल असाल ठाम विश्वास असल्याचे दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हंटले आहे.
निवड झालेली पदे पुढील प्रमाणे, जिल्हा अध्यक्ष राजू शेट्ये, जिल्हा सरचिटणीस रिमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बबन शिंदे, तालुका अध्यक्ष वैभव मालंडकर, तालुका सरचिटणीस संतोष दळवी, बाळा दळवी, राजू राणे आदीचा समावेश आहे.
तालुका अध्यक्ष वैभव मालंडकर म्हणाले, दिलेल्या पदाचा महाराष्ट्रातील तमाम संघटित व असंघटित कामगार बंधू-भगिंनीचा उचित सन्मान करून त्याना न्याय देण्याच्या दृटीने प्रयत्न करू तसेच तालुक्यात संघटनावाढीसाठी मेहनत घेऊन संघटना बळकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

