ग्रामपंचायत कुंदे सभागृहातील कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर संपन्न.

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.११: ग्रामपंचायत कुंदे आणि कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७, ८ आणि ९ आॅक्टोबर या तीन दिवसीय ग्रामपंचायत कुंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेले कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थित संपन्न झाले.

कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक श्री. देसाई यांनी प्रशिक्षणार्थींना कुक्कुटपालनातील बारकावे समजावून सांगितले. यामध्ये लहान पिल्लांचे संगोपन, त्यांना होणारे आजार, त्यावर औषध उपचार, लसीकरण, पोल्ट्री शेड, कोंबड्यांच्या जाती, मार्केटची उपलब्धता, मांसल कोंबडी आणि अंड्यांच्या कोंबडी याबाबत योग्य प्रकारचे मार्गदर्शन या शिबिरात अंतर्गत देण्यात आले. यशस्वी पोल्ट्री फार्मर सौ. पवार यांनी अनुभवपर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात कुंदे, कुसबे,  पोखरण या गावातील २१ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस, सिंधुदुर्गचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख श्री. काजरेकर, बाळासाहेब कृषी विद्यापीठ संस्था वेंगुर्ले प्राध्यापक, कुंदे गावचे सुपुत्र विजय देसाई, सरपंच सचिन कदम, कुसबे गावचे माजी उपसरपंच संदीप बागवे, लुपिन फाउंडेशन कृषी अधिकारी श्री. प्रताप चव्‍हाण, कुंदे गावचे कृषी सहाय्यक श्री. हडकर उपस्थित होते.

मान्यवराच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आली. व्यवसाय सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून प्रति प्रशिक्षणार्थींना २५ दिवसीय डि.पी. कोर्स जातीच्या ४  पिल्लांचे आणि ड्रींकरचे वाटप करण्यात आले.

कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी या तिन्ही गावांना पुढील पाच वर्षासाठी समृद्ध योजनेखाली मॉडेल स्वरूपात दत्तक घेतले आहे. यामध्ये सेंद्रिय शेती, स्वयं रोजगार, ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नती मध्ये वाढ करता-करता आरोग्यदायी आनंदी जीवन यासाठीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तशा प्रकारचा आराखडा कृषी प्रतिष्ठानचे प्रमुख ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि सरपंच सचिन कदम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याजवळ चार दिवसापूर्वी सादर करण्यात आला याची माहिती सरपंच सचिन कदम यांनी दिली. कुंदे गावासाठी विशेष सहकार्य करण्याचे अभिवचन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. तसेच गावात होत असलेल्या समाजोपयोगी विविध कामांचे कौतुकही त्यांनी केले.

याप्रसंगी ग्रामपंचायत कुंदे यांनी तयार केलेल्या उपयुक्त कुकुटपालन विषयी माहिती पुस्तिकेचे अनावरन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती होण्यासंबंधी ग्रामपंचायत कुंदे प्रयत्न करीत आहे. महिला तसेच युवकांनी पुढे येऊन अशा प्रकारचे व्यवसाय करावेत असे आवाहन सरपंच सचिन कदम यांनी केले.

यावर आधारित (मार्केटिंग संबंधी) तयार माल विक्री कार्यक्रम ग्रामपंचायत मार्फत आखण्यात येईल तसे नियोजनही करण्यात येत आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!