कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

संतोष तारी मित्रमंडळाच्या वतीने बांदा स्थानकाची साफसफाई

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी वाहतूक बंद असल्याने बांदा बसस्थानकात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये यासाठी येथील संतोष तारी मित्रमंडळाच्या वतीने बसस्थानकाची आज सायंकाळी साफसफाई करण्यात आली. त्यांच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गेले वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक बंद आहे. बांदा बसस्थानक हे महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवरील महत्वाचे स्थानक आहे. येथून नेहमीच आंतरराज्य प्रवासी वाहतूक होत असल्याने दररोज प्रवाशांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. कोरोना महामारीच्या काळात वाहतूक बंद असल्याने याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते.
येथील संतोष तारी मित्रमंडळाने बसस्थानक पूर्णपणे साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संतोष तारी, रुपेश माने, उमेश शेटकर, शिवप्रसाद राऊत यांनी साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला. मित्रमंडळाने सामाजिक जाणिवेचे भान ठेवून केलेल्या या मोहिमेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!