सिंधुदुर्गात अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी साडेपाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त; पालकमंत्री

▪️दिवाळीपुर्वी नुकसान भरपाईचे वाटप सुरु होणार; पालकमंत्री उदय सामंत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०८: अतीवृष्टी मुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई साठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाले आसल्याचे पालकमंत्री उदय सामंत आज म्हणले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाचे उद्घाटन आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी पालकमंत्री श्री. सामंत बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार आमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालनकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जि.प. सदस्य नगेन्द्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झाराप येथे वैद्यकिय महाविद्यालयासाठी शिक्षण विभगाची जागा देण्यास ४८ तासात मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणले की, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे या साठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत या साठी जनता दरबार सुरु करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुका स्तरावरही घेण्यात येणार आहेत. तळ्गाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. या तलाठी सजाचे उद्घाटन करताना मला मनापासून आनंद होत आहे. दर सोमवारी आणि गुरुवारी तलाठी या कार्यालयात थांबुन लोकांची कामे करतील. तलाठी यांंनी लोकांचा विश्वास संपादन करुन चांगले काम करावे असेही पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.

खासदार आणि आमदार यांचे कौतुक आदर्श खासदार कसे आसवेत हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात यावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचा वरसा लाभला आहे. याचे जतन खासदार विनायक राऊत करत आहेत. आमदार वैभव नाईक यांचे कामही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदार संघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत, या मतदार संघात सर्वात जास्त निधी आणण्याचे कामही आमदार श्री. नाईक यांंनी केले आहे.

सुरवातीस तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचीही भाषणे झाली.

*🌷⏰🌷हार्दिक स्वागत…!🌷हार्दिक स्वागत…! 🌷हार्दिक स्वागत…!🌷⏰🌷*

🙏⏰🌹 _राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष *मा.जयंत पाटील* यांचे *सिंधुदूर्ग जिल्ह्यात* हार्दिक स्वागत…_🌹⏰🙏

      *🌷स्वागतोत्सुक🌷*
▪️ *_श्री.पुंडलिक दळवी_*▪️
(जिल्हाध्यक्ष:- उदयोग व व्यापार विभाग)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.हिदायतुल्ला खान_*▪️
(जिल्हा कार्याध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.दर्शना बाबरदेसाई_*▪️
(महिला जिल्हाध्यक्षा)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.कुतूबुद्दीन शेख_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.आशिष कदम_*▪️
(जिल्हा उपाध्यक्ष )
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️ *_श्री.नवल साटेलकर_* ▪️
(तालुकाध्यक्ष-सावंतवाडी)
🌹⏰🌹⏰🌹⏰🌹
▪️श्री.नियाज शेख
▪️श्री.याकुब शेख
▪️श्री प्रसाद ढेरे
▪️श्री.फैज शेख

              _तसेच_

🌷⏰🌷 *सिंधुदूर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी…*🌷⏰🌷

🌹⏰🌹⏰🌹⏰🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!