🛑 कुडाळ -वेंगुर्ला रोड च्या दरम्यान रेल्वे ब्रिज जवळ तयार झालेले खड्डे त्वरित बुजवा ; शंकर सातार्डेकर यांची मागणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ, दि-२५ :- कुडाळ -वेंगुर्ला रोड च्या दरम्यान रेल्वे ब्रिज जवळ तयार(पडलेले ) झालेले खड्डे त्वरित बुजवा अन्यथा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे या बाबत सविस्तर वृत्त असे कि खूप दिवसा पासून या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि आता पाऊस चालू झाल्यामुळे ते खड्डे अधिक मोठ्या प्रमाणात तयार झालेत त्यात पाणी साचलेले असते त्या मुळे वाहन धारकांच्या लक्षात येत नाही आणि लक्षात न येता एकदा वाहन धारक तिथे पडून जखमी होई शकतो या ठिकाणी संबंधित विभाग यांनी लक्ष देऊन ते खड्डे बुजवा असे तेथील ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका टू व्हिल्लर मेकॅनिक असोशियन कमिटी प्रसार माध्यम प्रमुख श्री शंकर सातार्डेकर यांनी सांगितलं आहे

