कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 पालकमंत्री उदय सामंत उद्या सावंतवाडी दौऱ्यावर..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२४-: जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर येणार असून, यावेळी शहरातील विविध विकास कामांची उद्घाटन करणार आहेत. यामध्ये महामार्ग क्र. १७ पासून अँड बावकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, गुलमोहर कॉलनी मधील खुली जागा विकसित करणे, पांजर वाडा येथे पुल बांधणे, सालई वाडा हेरेकर ग्राउंड शेजारील वहाळाची रेटेनिंग वाॅल बांधणे, महादेव भाटले येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सुवर्ण कॉलनी येथे ओपन जिम बसविणे अशा प्रकारच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ४:३० या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिवसेना नगरसेवक तथा शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!