आरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🛑 चिपळूण नगरपालिका आरोग्य समितीकडून शहरात डेंग्यू साथ नियंत्रण मोहीम..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण, दि-२४ :- नगरपालिका आरोग्य समितीच्या वतीने शहरात बापटआळी, जुना भैरी, नवा भैरी परिसर तसेच राऊत आळी परिसरात शुक्रवार दिनांक २४ जून रोजी डेंग्यू साथ नियंत्रण मोहीम राबविण्यात आली.यावेळी आरोग्य सभापती शशिकांत मोदी, स्थानिक नगरसेविका रसिका देवळेकर ,संगीता रानडे , आरोग्य निरीक्षक महेश जाधव ,वैभव निवाते,आशा वर्कर सौ. सावर्डेकर. आदींचे पथक डेंग्यू सदृश्य रुग्ण असलेल्या घरोघरी जाऊन डेंग्यूचे डास कोठे तयार होतात तसेच काय दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती केली.

तसेच जे डेंग्यू सदृश्य रुग्ण,बालके उपचार घेत आहेत त्यांची फोन करून विचारपूस केली.सोबतच या संपूर्ण परिसरात फवारणी, टीसीएल पावडर टाकण्यात आली असून अशा प्रकारचे रुग्ण सापडू नयेत यासाठी नगरपालिका सर्वोतोपरी उपाययोजना करत असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी सांगितले आहे.

2 thoughts on “🛑 चिपळूण नगरपालिका आरोग्य समितीकडून शहरात डेंग्यू साथ नियंत्रण मोहीम..

  • Ashok D Parab

    प्रत्येक बातमी वाचली चांगली आहे

  • Pratik Rane

    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!