आपत्कालीन

पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा शेतकर्‍याला फटका.

_*🛑 पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभाराचा शेतकर्‍याला फटका..*_

_*🛑 तब्बल दिड लाख किमतीचा भला मोठा रेडा गेला वाहून..*_

_*🛑 उशीराने दाखल झालेल्या पशुवैद्यकिय अधिकार्‍याने जमिनित पुरलेला रेडा बाहेर काढून केले शवविच्छेदन..*_

_*🛑 शेतकऱ्यांकडून संबंधीत अधिकारी धारेवर..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२२ :-* तिलारी पाटबंधारे विभागाच्या गलथन कारभारचा पुन्हा एकदा फटका आवाडे येथिल शेतकर्‍याला बसला. आवाडे येथिल शेतकरी रमेश नाईक हे घोटगे येथिल आपल्या शेतातून नांगरणी करून आवाडे येथे आपल्या घरी नांगरणी साठी घेवून गेलेल्या रेड्यांना सोबत परत घेवून येत असताना घोटगे व आवाडे याला जोडणाऱ्या पूलावरून अचानक नदिच्या पाण्याची पातळी वाडल्यामूळे दोन्ही रेडे वाहून गेले. सुदैवाने एक रेडा वाचला परंतु दुसरा रेडा पुलाच्या पाईप मध्ये अडकला व पाण्याची पातळी अतिशय तिव्र झाली तेव्हा तो वाहून गेला.
वाहून गेलेल्या रेड्याची काल पासून शोधाशोध सुरू होती मात्र तो आज परमे येथे नदीत एका फार्महाऊच शेजारी अडकलेला सापडला.
त्यानंतर पशुसंवर्धनचे अधिकारी, तलाठी गोरे, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच पोलिस पाटील यांना संपर्क साधत त्यांना तेथे बोलावण्यात आले.तलाठी गोरे, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच पोलिस पाटील यांनी दखल घेत मृत रेड्याची पाहणी केली. मात्र पशुसंवर्धनचे अधिकारी तेथे तीन वाजे पर्यंत न आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तो रेडा जेसीबी च्या साहाय्याने उकलून पुरला.
त्यानंतर पशुसंवर्धनचे अधिकारी डॉ. दाभाडे हे संध्याकाळी चार च्या सुमारास आले व पुरलेला रेडा शेतकऱ्यांकडून खोदून बाहेर काडून घेत शवविच्छेदन केले. मात्र संतप्त शेतकर्‍यांनी पशुसंवर्धनचे अधिकारी दाभाडे यांना चांगलेच धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!