लुपिन फाऊंडेशनच्या वतीने कोलगांवातील विलगीकरण कक्षाला विविध साहीत्य भेट
कोलगांव ग्रामपंचायत तर्फे उभारण्यात आलेल्या ग्रामविलगीकरण कक्षाला आज लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने पिपीई कीट,ऑक्सी मीटर,टेम्प्रेचर गन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते भेट देण्यात आली.यावेळी लुपिन चे योगेश प्रभू,महेशकुमार चव्हाण,आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर,आरोग्य सेवक सापळे,कृषी अधिकारी अक्षय चव्हाण,आशासेविका,सरपंच संतोष राऊळ,उपसरपंच दिनेश सारंग,ग्रा.पं.सदस्य संदीप हळदणकर,राजा चव्हाण यासह ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.

