माडखोल गावात वीज पुरवठा वारंवार होतोय खंडित…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी : दि. २२ माडखोल गावात वीज पुरवठा वारंवार होतोय खंडित २५ तारीखपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास माडखोल ग्रामपंचायतीसमोर रस्ता रोको आंदोलनाचा माडखोल ग्रामस्थांचा इशारा देण्यात आला.
माडखोल गावात गेली सहा महिने वीज पुरवठ्याचा लपंडाव चालू आहे. माडखोल ठाकुरवाडी येथे इलेक्ट्रिक डी.पी.ची दुरवस्था झाली असून, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तेथून येणार्या जाणार्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
तेथील अभियंता चव्हाण ग्रामस्थांना देतात उडवाउडवीची उत्तरे, प्रलंबित असलेली वायरमन व लाईनमन यांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. २५ तारीखपर्यंत वीज पुरवठा सुरळीत नाही झाला, तर माडखोल ग्रामपंचायतीसमोर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सावंतवाडी महावितरण उप अभियंता एस. एस. भुरे यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, माडखोल माजी सरपंच संजय लाड, व्हि.डी ठाकूर, अक्षय ठाकूर, विलास ठाकूर, मनोहर राऊळ, दत्तात्रय सावंत, आनंद राऊळ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

