आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

खेमराज मेमोरियल मध्ये गरीब व होतकरू विद्यार्थीनींना सायकल वाटप

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा : दि. २२ गोवा विमानतळ प्राधिकरण आणि जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थिनींना मिळालेल्या सायकलचे वाटप आज खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे करण्यात आले. गरजू व होतकरू अशा दहा विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांच्याकडे सायकल सुपूर्द करण्यात आल्या.

या प्रसंगी सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य श्री शीतल राउळ, बांदा सरपंच श्री अक्रम खान, संस्था कार्यकारिणी सदस्य श्री मकरंद तोरसकर, श्री दादू कविटकर, मुख्याध्यापक श्री पावसकर, पर्यवेक्षक श्री नंदकिशोर नाईक, श्री प्रदीप देसाई आणि सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!