त्या मग्रूर रुग्णावाहीका मालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार चालु असुन त्याला अद्दल घडविल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही – दया मेस्त्री
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २० कोरोना रुग्णांच्या नातेवाईक महिलेशी असभ्य वर्तन करून अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या, अवाजावी भाडे आकारून जनतेला लुटणाऱ्या रुग्णवाहिका मालकाला अद्याप अटक नाही.
कोरोना रुग्णवाहिका मालकाने भाड्यावरून अर्वाच्य भाषेत एका महिलेशी वाद घातलेली क्लिप सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरलं झाली. एका महिलेशी अरेरावी करीत उचलण्याची धमकी देणाऱ्या या नराधमा विरोधात सर्वस्तरावर नाराजी निर्माण झाली होती.हा इसम कोरोना काळात कित्येक दिवस अशाप्रकारे दादागिरी करून इतर रुग्णवाहिका मालकांना त्रास देण्याचा प्रकार करीत होता.कोणतंही तारतम्य न बाळगता बेसुमार भाडे आकारून कोरोना काळात जनतेची लुबाडणूक या नराधमांने केलेली आहे.
माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही. पोलीस, RTO, माझ्या खिशात आहेत. हे या इसामाचं बोलणं खरं आहे की काय..? असे जिल्ह्यातील जनतेला वाटु लागले आहे..
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना मी निवेदन दिलेले आहेच. मात्र त्यांच्याकडुन देखील कारवाई झाली नाहीच, तर राज्य पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे दाद मागुन कारवाई करण्यास भाग पाडू.

