आणखीकुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

ठेकेदारीच्या जीवावर उडणाऱ्यांनी आमदार वैभव नाईक लांबच, पण एखाद्या युवासैनिकाशी लढुन दाखवावे…

🛑 युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा पलटवार

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : सद्गुरू घावनळकर

🎴कुडाळ : दि. २० काल पोलीस होते म्हणून सुटलात नाय तर १५ जणांच काय झालं असत १५० च्या समोर ते कळलं असत. पण एक गोष्ट कळली की, कुडाळ तालुक्यात १५ ते १६ जण राणे समर्थक आहेत. हे जगजाहीर झालं आणि काहीजण घाबरून आले नाहीत. अशी बातमी आहे, आमदार पळकुटे असते तर ते पेट्रोल पंपाच्या परिसरात गेलेच नसते.

आमदारांना फुकट्या म्हणण्यापेक्षा स्वतः आधी पुणे महानगरपालिकेच पाणी बिल भरा, यावरून कोण फुकट्या आहे ते कळतंय. आम्हीच २०१४ ला एक पार्सल पाठवलं, थोड्या दिवसांनी कणकवलीतल पार्सल मुंबईत जाईल याची नक्की काळजी घेऊ. मालकाला खुश करण्याचे जे प्रयन्त चालले आहेत, ही त्यांची केविलवाणी धडपड आहे

काहीजण स्वतःच्या मुलाला मारलं म्हणून बोंब मारत होते, ते आता निसक्यासारखे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करता आहेत. तुमच्या रुपेश कानडे आणि पप्या तवटेना आमचा गोट्या चव्हाण आणि नितीन सावंत पुरून उरतील. आमदार, शिवसैनिक सोडाच पण साध्या युवासैनिकाला जरी हात लावून दाखवा आणि कोण कोणाच्या मागे लपत ते बघूया उगाच तोंडाची वाफ घालवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!