कणकवली विधानसभा क्षेत्रातील १६९ सरपंचांचा “हेल्थ इन्शुरन्स” उतरणार – भाजपा आमदार नितेश राणे
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०७ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारी निस्वार्थीपणे आपल्या गावातील सरपंच जीवाची पर्वा न करता लढत आहेत. शासनाकडे अनेकदा मागणी करुनदेखील त्यांना विमा देण्याचा शब्द पाळला नाही. खऱ्या अर्थाने सरपंच कोरोना योद्धा असा शब्द मुख्यमंत्र्यांकडुन वापरला जातो. मात्र त्यांना प्रोत्साहन, त्यांना ताकद देण्याची शासनाकडुन गरज असताना, त्यांची घोर फसवणुक केली जात आहे. अनेक सरपंचांचा या कोरोना महामारी मृत्यू झाला आहे. पालकमंत्र्यांनी अनेकदा घोषणा करुन सरपंचांना विमा देण्याचे वचन दिले होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणेची पुर्तता विरोधी पक्षाचा आमदार म्हणुन मी करणार आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रातील १६९ सरपंचांचा “हेल्थ इन्शुरन्स” उतरणार असल्याची घोषणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.
🌐ऑनलाइन पद्धतीने आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिले.त्या मतदारांना दिलासा देण्याची भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे. कणकवली विधानसभेतील तीन तालुक्यांमधील सरपंच गेल्या एक वर्षापासून जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे राजकीय विरहित हा कार्यक्रम हेल्थ इन्शुरन्स घेत आहे. चोलामंडलम या कंपनीचा इन्शुरन्स उतरवला जाणार आहे भारतात ९३०० हॉस्पिटल या कंपनीची टाइप आहेत. एक देशातील दर्जेदार इन्शुरन्स कंपनी असून त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेतील सरपंचांना होणार आहे. प्रत्येक सरपंचाला वैयक्तिक स्वरूपात ३ लाखाचा इन्शुरन्स एका वर्षासाठी असणार आहे. त्या ३ लाखापेक्षा जर अधिकचा खर्च वैद्यकीय उपचारासाठी आल्यास ७५ हजार खर्च वाढवून दिला जाईल. या इन्शुरन्स मध्ये गरोदर महिला असतील, त्यांनाही विमा कवच असेल.या विमाच्या माध्यमातून सरपंचांना नेटवर्कमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार केले जातील. तर इतर हॉस्पिटलमध्ये बिल सादर केल्यानंतर ३० दिवसाच्या आत हा इन्शुरन्स केला जाईल. तसेच होमिओपॅथी,आयुर्वेदिक, युनानी या पद्धतीने उपचार घेतल्यास संबंधित डॉक्टर रजिस्ट्रेशन असेल त्याचीही बिले दिली जातील.काही रुग्णांना घरीच उपचार केला,तरी त्या डॉक्टरांची व अन्य वैद्यकीय खर्च दिला जाईल.कदाचित बाहेरगावी रूग्ण असल्यास आणि त्यांच्या नागरिकांना प्रवास करावा लागत असेल तर त्यांच्यासाठी पाच हजार रुपये खर्च दिला जातो. त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास प्रवासासाठी तीन हजार रुपये किंवा रुग्णवाहिका साठी दोन हजार रुपये दिला जातो. काही रुग्ण एका डॉक्टरची तपासल्यानंतर दुसर्या डॉक्टरकडे गेल्यास त्याचीही फी दिली जाते. या हेल्थ इन्शुरन्स च्या माध्यमातून सरासरी एका पॉलिसीधारकाला साडेसात लाखापर्यंतचा फायदा होणार आहे,असे नितेश राणे यांनी सांगितले.
त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६९ सरपंचांनी आपली परिपूर्ण माहिती आम्हाला द्यावी. हेल्थ इन्शुरन्स कार्यक्रमांमध्ये कुठलेही राजकीय मतभेद ठेवू नयेत, कारण हा आपल्या सर्वांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असून सर्व आजार या हेल्थ इन्शुरन्स मध्ये उपचारासाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे मी कणकवली विधानसभा मतदार संघात सरपंच यांच्यासाठी विमा देणार आहे. त्यामुळे कुडाळ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आमदारांनाही माझी विनंती आहे. सरपंचासाठी सत्तेतले आमदारानी व पालकमंत्र्यांनी विमा कवच द्यावे,असा उपरोधिक टोलाही आमदार नितेश राणे यांनी सत्ताधारी शिवसेना आमदारांना लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना मुक्त गाव या मुद्द्यावर चर्चा करतात. मात्र त्या गावातील प्रथम नागरिक म्हणून सरपंच जो काम करतोय, गेल्या वर्षापासून या कोरोनाच्या महामारीत अशी भूमिका बजावत आहेत,त्यांना विमा दिला जात नाही,ही माझी राजकीय भूमिका नसून एक सर्वसामान्य काम करणाऱ्या माणसाला विमा द्यावा यासाठी प्रयत्न आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार यांना जिल्हा परिषदने लसीकरणाचा प्रयत्न केला. मात्र राजकीय द्वेषाने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांनी हे लसीकरण बंद करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकण्याचा आरोपही आमदार नितेश राणे यांनी केला.