आपत्कालीनकुडाळकोकणसिंधुदुर्ग

कुडाळ येथील पोलिस हवालदाराचे उपचारादरम्यान निधन

कुडाळ, दि, २४: येथील पोलिस स्टेशनचे हवालदार तथा माजी सैनिक अजितकुमार पाटील वय ४२ रा. कुडाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यानंतर स्वतः कुडाळ येथे प्राथमिक रुग्णालयात दाखल झाले होते. तेथून पोलिस ते स्टेशन मधील सहकाऱ्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी पडवे येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली? याबाबत कारण कळू शकले नाही. याबाबत कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!