आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आँँटोरिक्षा चालक-मालक संघटना सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रिक्षा स्थानक यांचे स्तुत्य कार्य

🛑आँँटोरिक्षा चालक-मालक संघटना सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रिक्षा स्थानक यांचे स्तुत्य कार्य

🛑तृप्ती बांदिवडेकर,निरवडे-कोनापाल हिला किडनी उपचारासाठी आर्थिक मदत व मदतीचे आवाहन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,ता22,:- “रंजल्या जिवाची करितो ची सेवा,तोची खरा साधु तोची खरा संत॥”
अशी विचारधारा बाळगून आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रिक्षा स्थानक यांच्या वतीने तृप्ती बांदिवडेकर (वय 20 वर्षे) हिला किडनी उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.सदर युवती बी. काम पदवीधर असून तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.युनियनतर्फ शुक्रवारी युवा समाजसेवक सतीश तोरसकर यांच्या कडे तातडीची मदत म्हणून वर्गणी स्वरूपात रक्कम गोळा करून सुपूर्द करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील निरवडेचे -कोनापाल येथील बांदिवडेकर वाडी मधील रहिवासी असलेली तृप्ती बांदिवडेकर हिला मागील जुलै 2021 पासून किडनीचा त्रास होत आहे. तिच्यावर मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात किडनी निदान करण्यात आले असून तिच्यावर बोरीवली येथील नवनीत रुग्णालय येथे डायलोसीस सुरु आहेत.तिच्यावरील पुढील उपचारासाठी अमाप खर्च अपेक्षित आहे. मात्र हा खर्च बांदिवडेकर कुटूंबियाच्या आवाक्या पलीकडचा आहे. तिला आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे.
ही बाब लक्षात घेऊन मळगांव येथील आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना सावंतवाडी रेल्वे टर्मिनस रिक्षा स्थानक चे अध्यक्ष सहदेव सामंत, उपाध्यक्ष संजय भाईडकर,सचिव अजित सातार्डेकर, खजिनदार मिलिंद सोनुर्लेकर व येथील सर्व रिक्षा चालक व मालक यांनी पुढाकार घेऊन ही रक्कम जमा केली. यापुर्वी सुद्धा युनियन तर्फे गावातील रुग्ण, गरजू विद्यार्थी, शेतकरी, अंध -अपंग, विधवा व वृद्ध तसेच अन्य गरजवंत यांना असाच मदतीचा हात पुढे करुन मोलाची कामगिरी केली आहे.मळगांव येथील रिक्षा चालक-मालकांनी केलेल्या या मदतकार्याचे कौतुक मळगांव व पंचक्रोशीत होत आहे.तृप्ती हिच्यावर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी रिक्षा चालक-मालक युनियन तर्फे ज्या दानशूर व्यक्तीना तृप्ती बांदिवडेकर हिला किडनी उपचारासाठी आर्थिक मदत करायची असेल व या कार्यात हातभार लावायचा असेल त्यांनी तिच्या नातेवाईक विकास बांदिवडेकर यांच्याशी मो. क्र. 8369055113 किंवा 9870239939 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*🏝️जागा भाड्याने देणे आहे*

*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*

👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला

🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️

*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!