अन्यथा ६ जुन पासून आपणास नवीन आंदोलन उभारावे लागेल-अँड सुहास सावंत
सावंतवाडी,दि.२८ मे (प्रतिनिधी)
शासनाने दि.६ जुन राज्यभिषेक दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यचे ठरविले आहे. त्यापूर्वी प्रशासन व मराठा प्रतिनिधी यांची मिटिंग होणे आवश्यक आहे. अन्यथा ६ जुन पासून आपणास नवीन आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा सिंधुदुर्ग मराठा समाज अध्यक्ष अँड सुहास सावंत यांनी दिला आहे.
अँड सुहास सावंत यांनी म्हटले आहे,मराठा आरक्षणचा निकाल लागून २५ दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे.केंद्र किंवा राज्य सरकार यांचे धोरण एकमेकांवर जबाबदारी ढकलणे एवढेच दिसत आहे. आरक्षणाचा निकाल बाबत संभ्रम आहे. अश्या स्थितीत नेमके काय करावे हे ठरणे आवश्यक आहे.
परंतु स्थानिक पातळीवर काही प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्याबाबत काहीतरी आपण जिल्हा पातळीवर काम करणे गरजेचे आहे.
अँड सावंत म्हणाले, मराठा आरक्षण आज अस्तित्वात नाही मी गेल्यावर्षी इव्हीएस मधून मराठा समाजाला लाभ मिळावे याकरीता पालकमंत्री महोदय याना जनता दरबार मध्ये निवेदन दिले होते.त्याची मिटिंग जाणीवपूर्वक निवासी जिल्हाधिकारी यांनी अद्याप पालकमंत्री यांचे आदेश असताना लावली नाही. मराठा मुलांना इयत्ता अकरावी ते पुढील शिक्षणात इव्हीएस आरक्षणाचा लाभ मिळणे करीता हा दाखल महत्वाचं आहे.याकरीता ही मिटिंग लावणे व निवासी जिल्हाधिकारी यांनी मिटिंग न लावल्यामुळे त्यांच्यावरवर कारवाईची मागणी करणे गरजेचे आहे.
ते म्हणाले,राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील मुलांना दिला जात नाही आहे. याबाबत आपण २३ ऑक्टोबर २०१८ ला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. सदरची योजना इयत्ता अकरावी ते पुढील उच्च शिक्षणापर्यंत लागू आहे.आपल्याकडे मराठा मुलांना इयत्ता अकरावी मध्ये विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागतो. सदर तुकडीत प्रवेश घेणाऱ्या मुलांकडून देणगी घेतली जाते वरील योजनेत फक्त शैक्षणिक फी चा समावेश आहे. आपण कॅपिटेशन फी कायदा अमलबजावणी करण्याची मागणी केली तर हा प्रश सुटू शकतो. त्याचप्रमाणे आज प्रर्यंत मराठा समाजाला मिळालेल्या लाभ याचा फायदे समाजला देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय केले याची शेतपत्रिक प्रशासनाने जाहीर करणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच ऑनलाईन गुगलमीटवर याबाबतची चर्चा करून धोरण ठरविण्यात येणार आहे असे अँड सुहास सावंत यांनी सांगितले.

