आरोग्यकोकण

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळणार रुग्णवाहिका

सावंतवाडी — महिला बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर यांच्या मागणीला अखेर यश आले असून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवी रुग्णवाहिका येत्या दोन दिवसात मिळणार आहे.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या रुग्णवाहिकेला सोळा वर्षे पूर्ण झाल्याने त्या रुग्णवाहिकेत वारंवार बिघाड होत होता. मात्र या केंद्रात येणाऱ्या दुखापतग्रस्त व अन्य रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचा अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने हीच रुग्णवाहिका वापरली जात होती.तसेच कोरोना रुग्णासाठी हीच रुग्णवाहिका वापरली जात आहे. लसीकरण असो किंवा गरोदर महिला असो त्यांच्यासाठी ही हीच रुग्णवाहिका वापरली जात होती. यामुळे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाकडून नवी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांना निवेदन देऊन केली होती. यानंतरही गावकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर शासनाकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आली असून ती कोल्हापूर येथे दाखल झाली आहे.अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत यांनी आपल्याला दिल्याचे शर्वाणी गावकर यांनी सांगीतले. येत्या एक-दोन दिवसात सदरची नवीन रुग्णवाहिका मळेवाड आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.रुग्णवाहिका मिळावी म्हणून गावकर यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक व मळेवाड कोंडूरे सरपंच हेमंत मराठे यांनी ही मागणी करून पाठपुरावा केला होता.यामुळे ग्रामस्थ व रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!