कोकणदोडामार्गसिंधुदुर्ग

त्या खाणी म्हणे अस्तित्वात नाही….अधिकाऱ्यांचा अजब खुलासा!!!

Kokan Live Breaking

प्रतिनिधी:-प्रतिक राणे

दोडामार्ग,दि.०६:- तालुक्यातील अनेक गावात कायदेशीर आणि बेकायदेशीर स्वरूपात दगडी खाणी(जांभा दगड) सुरू आहेत.मात्र यातील बऱ्याचश्या खाणी ह्या वापरुन झाल्यानंतर तशाच पडुन आहेत. उघड्या झालेल्या खाणी या पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे धोकादायक ठरत आहे.आत मध्ये भरलेल्या पाण्यामुळे रिकाम्या खाणी किती खोल आहेत याचा अंदाज येत नाही.
रविवारी वझरे गावात घडलेल्या घटनेमुळे रिकामी खाणी ह्या पुन्हा एकदा संशयाच्या भोवत्यात सापडल्या आहेत.रिकाम्या झालेल्या खाणी ह्या वापरुन झाल्यानंतर संबंधित मालकाने बुजवणे आवश्यक होते. त्यावर संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे लक्ष असणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संबंधित खाणमालक व तत्कालीन महसूल अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले त्यावेळी हा अजब प्रकार समोर आला.
ज्या खाणी मध्ये दोनही मुले बुडाली त्या खाणी अस्तित्वात नाही असे माहितीवरून कळाले. महसूल विभाग किंवा त्या भागातील तलाठी या खाणीं विषयी अधिक माहिती देऊ शकले नाहीत सदर खाण निवेदनात लिहीलेल्या सर्वे न. 186मध्ये नसल्याचा खुलासा त्यांनी केला. यामुळे ह्या सुरू असलेल्या खाणी अवैध असुन त्या तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी या आंदोलकांनी केली.
त्यामुळे संबंधित गावा बरोबरच इतरत्र अनेक गावात ज्या ज्या बेकायदेशीर अवैध खाणी आहेत त्या सर्व खाणमालकांवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होवू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!