आरोग्य

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्ग शाखेने दोडामार्ग तालुक्यातील पत्रकारांसाठी  ‘कोरोना सुरक्षा कवच’ भेट.

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्ग शाखेने दोडामार्ग तालुक्यातील पत्रकारांसाठी  ‘कोरोना सुरक्षा कवच’ भेट.*

दोडामार्ग / प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तालुक्यातील पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता वृत्त संकलनाचे काम करत असतात. हे काम करत असताना पत्रकारांना कोरोना आजाराने ग्रासू नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्ग शाखेने ‘कोरोना सुरक्षा कवच’ आज सोमवारी भेट दिले.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, शिक्षक नेते रवींद्र देसाई, तालुकाध्यक्ष मणिपाल राऊळ, सचिव सखाराम झोरे, जिल्हासचिव अरुण पवार, यांसह शिक्षक जनार्दन पाटील, दत्तप्रसाद देसाई, प्रमोद कुडास्कर, महेश नाईक, यशवंत गवस आदी उपस्थित होते.
सध्या संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीने विळखा घातला आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस तालुक्यातील रुग्ण संख्या वाढतच आहे अशा परिस्थितीत तालुक्यातील पत्रकार बांधव वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्यामुळे पत्रकार बांधवांना कोरोना आजार होऊ नये यासाठी शिक्षक भारती दोडामार्ग संघटनेने कोरोना सुरक्षाकवच भेट दिले आहे. यामध्ये मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, हँडवॉश, वाफ घेण्याचे मशीन यांचा समावेश आहे. तसेच येथील कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांना दर रविवारी व बुधवारी पौष्टिक आहार या संघटनेतर्फे पुरविला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!