◾देवेंद्र फडणवीस गो बॅक ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१९ :- देशामध्ये राष्ट्रीय आपत्ती असताना आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वागलात ती वर्तवणूक सत्ता पिसासू होती राष्ट्रीय आपत्ती मध्ये संपूर्ण देशाने एकत्र येऊन काम करायला हवं होतं परंतु तुमची सत्ता गेल्यानंतर गेल्या दीड वर्षातील तुमची वर्तवणे शाळेतील वर्गामधील एखाद्या नाटाळ विद्यार्थ्या सारखी झाली आहेत, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे थैमान सुरू असताना आपण सरकार कोसळण्यासाठी करत असलेले प्रयत्न हे लांच्छनास्पद हो ते सरकारची बदनामी करत करता तुम्ही दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत होता ,सत्तेचा माज कसा असतो हे तुम्ही दाखवून दिलं त्यामुळे तूम्ही कोकणात येऊच नका परत जा अशी खरमरीत टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
जे चुकले असतील त्यांना शासन व्हायलाच हवं परंतु प्रत्येक विषय दिल्ली अखत्यारी नेऊन शासनाला अडचण करण्याचे प्रयत्न केलात, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे ,या महाराष्ट्राने मुख्यमंत्री होऊन तुम्हाला पाच वर्षे सहन केलं, महाराष्ट्र एकसंघ होऊन लढला असता तर करोना मुळे अनेक नागरिकांचे जीव वाचू शकले असते ,परंतु तुम्हाला सत्ता पून्हा आणायची होती सत्तेच्या नादात थयथयाट करून रुग्ण वाढण्यासाठी आपण व आपल्या सहकार्याने केलेले प्रयत्न महाराष्ट्राने पाहिले आहेत,असा टोला साळगावकर यांनी हाणला.
ट्रेन सुरु करा, मंदिरे उघडा, करोना असतानाही परीक्षा घ्या, बस सुरू करा, जिम शाळा कॉलेज सुरू करा ,आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले , याचे भोग आज महाराष्ट्र
जनतेला भोगावे लागत आहेत, प्रत्येक गोष्ट उघडायला लावली त्यांची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात का? असा सवाल केला आहे.
जखम ही तुम्हीच करायची मलम पण आपणच लावतो.हा बहाना करायचा मूर्ख महाराष्ट्राची जनता नाही, याची दखल तुम्ही घ्या करोना काळात मला राजकारण करायचं नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्र त जवाबदार वागत आहात कोकणात येत आहे तर म्हणून याची दखल घेणं क्रमप्राप्त आहे पुन्हा एकदा म्हणतोय देवेंद्र गो बॅक असे साळगावकर यांनी म्हटले आहे

