◾दत्ता सामंत यांचे कोरोना रुग्णांसाठी अविरत सेवाकार्य..
◾वैद्यकीय सुविधा, औषधसाठा, ऑक्सिजन सिलिंडरचाही पुरवठा : स्वतःची गाडीही दिवसरात्र रुग्णसेवेत..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि-१९ :- उदोजक तथा भाजप नेते दत्ता सामंत कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. मालवणसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कोणीही संपर्क केला तरी गरजू रुग्णाला ऑक्सीजनसह आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यासाठी दत्ता सामंत सदैव तत्पर आहेत.
वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना गोळ्यांचे स्पेशल किट, ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना ऑक्सिमिटर, वाफेचे मशीन व अन्य वैद्यकीय सुविधा देताना गरजू रुग्णाना प्रसंगी खाजगी रुग्णालयात स्वखर्चातून सेवा देत आहेत. रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करत, रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी स्वतःची गाडीही सामंत यांनी दिवसरात्र सेवेत ठेवली आहे. सध्यस्थीतीत ६ ऑक्सिजन जम्बो सिलिंडर, २ मिनी सिलिंडर सेवेत असून उद्यापासून चार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर मशीनही सेवेत असतील अशी माहिती दत्ता सामंत यांनी दिली.
जिल्ह्यात अनेक रुग्णालयात ऑक्सिजन बेडची अपुरी संख्या लक्षात घेता अत्यावश्यक स्थितीत ज्या रुग्णाला ऑक्सिजनची तात्काळ गरज आहे त्यांना स्वखर्चातून ऑक्सिजन जम्बो सिलिंडर रुग्णालयात उपलब्ध करून दिले जात आहेत.
औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांपर्यंत थेट पोहचून त्यांना धीर देण्याचे व त्यांना बळ देण्याचे सेवाकार्य सामंत करत आहेत. दत्ता सामंत यांच्या रूपाने आम्हाला मोठा आधार मिळत असून दत्ता सामंत आमच्यासाठी देवदूत म्हणून उभे राहत आहेत. अश्या भावना अनेक रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. अखंड जनसेवा करणारी माणसे आता दुर्मिळ होत आहेत. मात्र गरजू, संकटग्रस्त यांच्या मदतीसाठी आज देव उभा आहे तो म्हणजे दत्ता सामंत अश्या भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. आमडोस गावचे माजी सरपंच दिगंबर नके यांना गंभीर परिस्थितीत आपण रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. आज खंबीरपणे त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभे राहून गावातही जे सेवाकार्य आपण करत आहात. त्याबाबत आम्ही शतशः ऋणी आहोत. अनेक गावातून अश्या भावना व्यक्त होत आहेत.
लक्षणे दिसल्यास टेस्ट करा..
अनेक रुग्ण ताप, सर्दी अशी लक्षणे दिसल्यास सुरवातीला अंगावर काढतात. अश्या अंगावर काढणाऱ्या रुग्णांना काही दिवसात अधिक त्रास होतो. संसर्ग घरातही अन्य व्यक्तींना पसरतो. तरी ताप, सर्दी, खोकला आदी त्रास जाणवल्यास तात्काळ टेस्ट करावी. कोरोना संसर्ग असल्यास वेळेत उपचार झाल्यास लवकर बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णांनी टेस्ट व अन्य तपासणी यासाठी काही मदत लागल्यास रुग्णालय अथवा आपल्याशी संपर्क।साधावा असे आवाहनही दत्ता सामंत यांनी केले आहे.
चार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर उद्यापासून सेवेत
अत्यावश्यक स्थितीत ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णाला कोणत्याही ठिकाणी सहज वापरता येतील असे चार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेकटर मशीन दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून उपल्बध केले आहेत. उद्यापासून या मशीन रुग्णसेवेत उपलब्ध असतील. रुग्णांना तात्काळ सेवा मिळून त्यांचे जीव वाचवणे या भावनेतून आपले प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले.
डॉक्टरांचे सहकार्य
कोरोना काळात जी वैद्यकीय सेवा सुरू आहे ती प्रामुख्याने डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. विवेक रेडकर, डॉ. दर्शन खानोलकर व अन्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शन व सल्ल्याने आपण देत आहोत. त्या बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचेही वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळाले. असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे यांची मोलाची मदत
एखाद्या रुग्णाला अत्यावश्यक स्थितीत काही अत्यंत गरजेचे इंजेक्शन, अन्य औषधें, व्हेंटिलेटर यांची गरज भासल्यास ती सेवा अगदी मध्यरात्रीही आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिली. आमदार नितेश राणे यांचे मोलाचे सहकार्य वेळोवेळी मिळत असल्याचेही दत्ता सामंत यांनी सांगितले.

