आणखीमहाराष्ट्रवैभववाडीशैक्षणिकसिंधुदुर्ग

◾जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आयुष नाळे द्वितीय..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-१९ :- शिवप्रेमी ग्रुप सिंधुदुर्ग – कुडाळ यांच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आयुष नाळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधून शिवप्रेमी ग्रुप सिंधुदुर्गतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी ” छत्रपती संभाजी महाराज” असा विषय देण्यात आला होता.

या गटातून वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेचा इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी आयुष नाळे याने द्वितीय क्रमांक पटकावला.त्याला मुख्याध्यापिका सुप्रिया शेटये,प्रफुल्ल जाधव,अमोल येणगे,प्रदीप नाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे,विस्तार अधिकारी निसार नदाफ,केंद्रप्रमुख शिवाजी पवार,शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन केले.सर्व स्तरातून आयुषचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!